माजी महापौर शांताराम काळे यांचे निधन

Foto

औरंगाबाद: शहराचे प्रथम महापौर शांताराम यशवंत काळे (रा. दशमेशनगर) यांचे आज पहाटे सव्वा चार वाजेच्या दरम्यान दुख:द निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

 अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्या शांताराम काळे यांना शहराचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. १७ मे १९८८ ते ५ जुलै १९८९ या काळात त्यांनी महापौर पद भूषविले. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा दशमेश नगर येथिल घरून निघून प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.