बांगलादेशी मुलीची तस्करी, लैंगिक शोषण प्रकरणी ४ आरोपींना १० वर्षांची सक्तमजुरी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशातून भारतात आणलेल्या एका अल्पवयीन मुलीची विक्री करून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या चार आरोपींना विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवत प्रत्येकी १० वर्षांची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने पीडितेला भरपाई देण्याचेही आदेश दिले.
विशेष पोस्को न्यायाधीश स्वर्णिता बी. महाले यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. आरोपींमध्ये सईद शाह उर्फ शेख आणि वाजिद इलियास शेख, समीना सिद्दीकी शेख आणि प्रशांत प्रत्युष रॉय यांचा समावेश
न्यायालयाची टिप्पणी
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने पीडित मुलगी स्वतःहून भारतात आली होती, असा दावा केला. मात्र न्यायालयाने म्हटले की, मानवी तस्करीचा बळी ठरलेली व्यक्ती गुन्ह्यातील आरोपी नसते. तिच्याविरुद्ध खटला चालवण्याऐवजी तिची सुरक्षित सुटका करून पुनर्वसन आणि मातृभूमीत परतण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
आहे. पीडित मुलगी बांगलादेशची रहिवासी आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिला नोकरीचे आमिष दाखवून दलालांच्या माध्यमातून भारतात आणण्यात आले. कोलकाता येथे तिला आरोपी आशाच्या ताब्यात देण्यात आले. आशाने पीडितेकडून पाच लाख रुपये मिळण्याची मागणी केली. त्यानंतर तिला एका व्यक्तीकडे विकण्यात आले. यानंतर पीडितेचे
विविध ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आले. जानेवारी २०२४ व मध्ये तिने स्थानिक परिसरातील व एका महिलेच्या मदतीने तेथून सुटका करून घेतली. त्यानंतर तिने वाजिद आणि समीना यांच्याशी संपर्क साधला. पुढे वडिलांच्या मदतीने बांगलादेश पोलिसांच्या सहकार्याने भारतीय पोलिसांशी संपर्क करण्यात आला.
व