मराठवाड्यातील चार उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर ; औरंगाबाद लोकसभेसाठी बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी

Foto

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील चार उमेदवारांची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. परभणी येथे झालेल्या सत्ता संपादन सभेत त्यांनी हि घोषणा केली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
     एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ मिळून स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्यातील अन्य तीन लोकसभा मतदार संघासाठीही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. बीड मधून प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबाद मधून अर्जुन सलगर, जालन्या मधून  डॉ. शरद वानखेडे तर औरंगाबाद मधून माजी न्यायमूर्ती व सामाजिक कार्यकर्ते बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील राहिलेल्या परभणी आणि हिंगोली मतदारसंघासाठी येत्या २३ तारखेला उमेदवार जाहीर करण्यात येतील असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.