चार महिन्यात रेल्वेरुळावर गेले 20 बळी !

Foto

औरंगाबाद: नैराशामुळे रेल्वेखाली आत्महत्या केल्या जात आहे. तसेच दरवाज्यात बसून प्रवास करताना तोल जाऊनही अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. यावर्षी चार महिन्यात रेल्वेखाली तब्बल वीस जणांनी आपला जीव गमवला असल्याची नोंद रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी केली आहे. रेल्वेने प्रतिदिन हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यातच अनेक जण अपघाताला बळी पडतात आणि आपला जीव गमवतात. जानेवारी ते एप्रिल दरम्यान, रेल्वेखाली आत्महत्या आणि अपघाताने चार महिन्यात 20 जणांचा जीव गेला आहे, अशी माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिस हेडकान्स्टेबल माणिक आचार्य   यांनी दै. सांजवार्ताशी बोलताना दिली. 

आठ अनोळखी व्यक्‍ती ..................
रेल्वेखाली अनेकांचा जीव जातो. त्यात काही जणांची ओळख पटत नाही. आत्महत्या केलेल्या 20 व्यक्‍तींपैकी आठ व्यक्‍ती अनोळखीच होते. त्यांच्या नातेवाईकांचा शोध रेल्वे पोलिसांना लागलेला नाही. 

आत्महत्या हा पर्याय नव्हे!
जीवनामध्ये दु:खामागून सुख जशी येतात. तसेच संकटेही जास्त वेळ राहणार नाही आणि आत्महत्या करणे हा पर्याय नाही. कितीही संकटे आली तरी त्यावर मात करावी. आत्महत्या करू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले.