सिरप सिंडिकेटचा म्होरक्या अश्फाकसह चौघांना अटक

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सिरप सिंडिकेटचा मास्टरमाइंड शेख अश्फाक शेख ईसाक ऊर्फ अश्फाक पटेलसह त्याच्या तीन साथीदारांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. महिनाभरापासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. १९ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता गुन्हे शाखेने नाशिक येथील एका हॉटेलमधून त्यांना उचलले. म्होरक्याला अटक झाल्यामुळे आणखी मोठमोठ्या बाबींचा खुलासा होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेख अश्फाक शेख ईसाक ऊर्फ अश्फाक पटेल (रा. रवींद्रनगर, शहाबाजार), पठाण दाऊद मुनावर खान (बायजीपुरा) आणि सरफराज मिर्झा हाफिज वेग (रा. शहाबाजार) आणि शेख फरदीन अब्दुल रज्जाक (रा. शहाबाजार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.