सिद्धार्थ उद्यानात ‘समृद्धी’ने दिला चार बछड्यांना जन्म !

Foto

औरंगाबाद : केवळ शहरातीलच संपूर्ण मराठवाड्यातील पर्यटकांचे आकर्षण असणार्‍या शहरातील सिद्धार्थ उद्यानातील ‘समृद्धी’ वाघिणीनेे शुक्रवारी रात्री  4 बछड्यांना जन्म दिला आहे.
समृद्धी वाघीण व बछड्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या चार बछड्यांमध्ये नर-मादी याची संख्या किती हे मात्र समजू शकले नाही.