चिखलठाणा येथे चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी !

Foto

औरंगाबाद : कन्‍नड तालुक्यातील चिकलठाण येथे अचानक आग लागून चार दुकाने जळून खाक झाल्याची घटना आज (28 मे) सकाळी घडली. या आगीत मोठे नुकसान झाले. कन्‍नड तालुक्यातील चिकलठाण भागात रस्त्यावर असलेल्या एका दुकानाला आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही मिनिटातच ही आग पसरत गेली. या आगीने आजूबाजूच्या इतर चार दुकानांना वेढले. आग लागल्याचे समजताच  नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घरातील पाणी आणून ही आग विझवली. लाकडी दुकाने असल्याने दुकाने पूर्ण जळून खाक झाली. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा अद्याम समोर आला नाही. आगीची माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे. पंचनामा झाल्यावरच नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.