साजवार्ता
Page No.: 6 Date: 17/11/2026
बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएसची चौथी यादी जाहीर
१ हजार ९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी
छत्रपती संभाजीनगरः महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६- २७ च्या प्रवेशासाठी आयुष वैद्यकीय शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या आयुर्वेद- बीएएमएस, होमिओपॅथी बीएचएमएस व युनानी बीयुएमएस या तीन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची चौथ्या फेरीची यादी जाहीर झाली आहे.
सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, आयुर्वे द- बीएएमएस, होमिओपॅथी बीएचएमएस व युनानी बीयुएमएस या तीन अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची जागावाटपाच्या तिसऱ्या फेरीनंतर बुलढाणा येथे नवीन नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला प्रथमय प्राधिकरणाकडून परवानगी मिळाल्यामुळे व स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्याची परवानगी नसल्यामुळे उच्च गुणवत्ताप्राप्त उमेदवारांना नवीन सरकारी महाविद्यालयात संधी मिळणार नाही यामुळे राज्य सरकारने प्रवेशासाठी विशेष चौथी कॅप फेरी आयोजित केली होती. यानुसार चौथी यादी जाहीर करण्यात आली. या चौथ्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमाच्या राज्यात २०८ आयुष महाविद्यालयात १४ हजार २०५ जागापैकी ११ हजार ५९१ जागेवर तिसऱ्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला असून १ हजार ९७९ विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे. तर ६.३५ टक्के जागा रिक्त आहेत.
आज सायंकाळपर्यत प्रवेश निश्चित करावे लागणार
आयुर्वेद - बीएएमएस या अभ्यासक्रमाच्या चौथ्या
यादीत राज्यात १४१ वैद्यकीय महाविद्यालयात ९ हजार ५७९ जागांपैकी ८ हजार १११ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत १ हजार २७७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १११ जागा रिक्त आहेत. यामध्ये २४ शासकीय महाविद्यालयात २२२ व ११७ खासगी महाविद्यालयात १ हजार ५५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली सधी आहे. तर होमिओपॅथी बीएचएमएस या अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यात ५९ वैद्यकीय महाविद्यालयात ४ हजार १९६ जागांपैकी २ हजार ४२ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत ६७० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ४८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये २ शासकीय महाविद्यालयात २० व ५७ खासगी महाविद्यालयात ६४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची मिळाली संधी आहे. यूनानी बीयुएमएस या अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यात ८ वैद्यकीय महाविद्यालयात ४३० जागांपैकी ३९८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत ३२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये यामध्ये ३ शासकीय महाविद्यालयात १ व ५ खासगी महाविद्यालयात ३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. एकही जागा रिक्त राहिल्या नाही. ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे त्या विद्यार्थ्यांनी आज (दि.१७) सायकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे व आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यदा उपस्थित राहून प्रवेश निश्चित करण्यासाठी वेळ दिली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













