छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दोन लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांना - निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या भामट्याला हसूल पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले आहे. पोलिसांनी आरोपीचा तब्बल दोन किलोमीटर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याचे दागिने - आणि दुचाकी असा एकूण ८ लाख १८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती हसूल पोलिस
हसूल पोलिसांची धडक कारवाई, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाण्याच्या निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
नागोराव सुखदेव श्रीरामे (वय ३०, मूळ रा. हनकदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली; सध्या रा. एस.टी. कॉलनी, सुरेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २५ जुलै रोजी सुमन रामदास औटी (वय ४६, रा.
गुरुचरण रेसिडेन्सी, हसूल) या हसूल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभ्या असताना आरोपीने त्यांना दोन लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने त्यांना अहिल्यानगर महामार्गावरील तिसगाव शिवारातील एका शेतात नेले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याजवळील दागिने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी हसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













