सिल्लोड, (प्रतिनिधी) : टिककनगर येथील विवेक मेडिकल तर्फे नागरिकांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे दर गुरुवारी आयोजन केले आहे. यामध्ये हरियांना येथील आयुर्वे दाचार्य डॉ. सुरज कुमार हे रुग्नांची विविध आजारावर मार्गदर्शन सल्ला, उपचार १००% आयुर्वेदिक पद्धतीने करतात. टिळक नगर येथील विवेक मेडिकल मेन रोड येथे दर गुरुवारी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.
या आयुर्वेदिक शिबिरामध्ये विविध प्रकारचे होणारे आजार याविषयी शंभर टक्के घरगुती विविध चिकित्सा पद्धतीनुसार रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील नागरिकांनी
विशेष करून बालकांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विवेक मेडिकलचे संचालक योगेश मगावकर यांनी केलेले असून हे शिबिर दर गुरुवारी आयोजित करण्यात आले आहे.
नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन विवेक मेडिकलचे संचालक योगेश मगांवकर यांनी केले आहे.















