माणिकनगरच्या श्री. सिद्धिविनायक मुलींचे वसतिगृहात मोफत प्रवेश प्रकिया सुरू

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी): माणिकनगर (भवन) येथील महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या मान्यतेने चालविल्या जाणाऱ्या आणि शासनाने राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्काराने सन्मानित केलेल्या श्री. सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ सेवाभावी संस्था संचालित श्री. सिद्धिविनायक मागसवर्गीय मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२६ २०२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ५ वी ते १०वी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे. या मुलींच्या वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक गरीब व मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थिनींनी पालकांसह आरक्षण कोट्यातील अनुशेष भरण्यासाठी त्वरित प्रवेश अर्ज करावेत. 

इयत्ता ५ वी साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. पालकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवेश अर्ज आणि वसतीगृह प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी चालू आहे. अधिक माहितीसाठी अधिक्षका श्री. सिद्धिविनायक मुलींचे वसतीगृह सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासमोर औरंगाबाद जळगाव रोड माणिकनगर (भवन) ता. सिल्लोड येथे संपर्क साधावा असे आवाहन वसतीगृह अधिक्षिका मनिषा बिडवे (बोराडे) यांनी केले आहे.

अनेक सुविधा मोफत
या वसतिगृहात निवासासह एक वेळेस नाष्टा, दोन वेळेस जेवण, अभ्यासिका, वाचनालय, कॉम्प्युटर लॅब, आरोग्य तपासणी, शालेय पुस्तके, अंघोळीसाठी गरम पाणी, सुविधा, विविध अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी यासारख्या अनेक सुविधा पूर्णतः मोफत आहेत.