गंगापूर, (प्रतिनिधी): मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी गरजेची मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मूत्रपिंडाच्या आजारामुळे अनेक रुग्णांना दर आठवड्याला नियमित डायलिसिस करावे लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर आर्थिक ताण पडतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी मोफत सुविधा उपलब्ध केली.













