रामकृष्ण मिशन आश्रमातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Foto
पैठण, (प्रतिनिधी): नाथषष्टी यात्रेनिमित्त रामकृष्ण मिशन आश्रम छत्रपती संभाजीनगर यांचे वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिराचे पैठण येथे आयोजन करण्यात आले आहे. वीस वर्षापासून हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. हे शिबिर यात्रेतील सर्वात मोठे आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप आहे.

पैठण येथील नाथषष्ठी यात्रेत यात्रेत गेल्या विस वर्षा पासून सातत्य पुर्ण रित्या राबविण्यात येत असलेल्या सेवाभावी आरोग्य तपासणी शिबिराचे यंदा ही नाथषष्ठी निमित्ताने आयोजन केले आहे. उद्घाटन रामकृष्ण आश्रमचे स्वामी रामव्रताआनंद व विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्षअक्षय पा. शिसोदे, तुषार पाटील शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले.

महात्मा गांधी मिशन, हेडगेवार रुग्णालय संभाजीनगर व चिखली, शेगावचे तज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करत आहेत. शिबिरात रुग्णांना लगेच मोफत औषधे दिली जातात. या शिबिरात जेष्ठ वारकरी मोठ्या प्रमाणात तपासणी करतात. पायी चालल्याने व उन्हामुळे त्यांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होते. ओआरएस पेय याचे ही वाटप होते. हे शिबिर तीन दिवस चालणार आहे. पहिल्या दिवसांत नऊशे पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली होती.

यामधे जेष्ठ डॉ. रामदास अंबुलगेकर डॉ. सुभाष शहा. डॉ. संतोष बोरुळ, डॉ. नादगे, जनार्धन घुगे, डॉ. कुणाल कर्णावट, डॉ. पुष्पक कदम पांडुरंग जाधव, भारत झोडपे, दिलीप कौंदर, डॉ. रणधीर घोडके एमजीएम छत्रपती संभाजीनगर यांचेसह मोफत औषधी साठी सहकार्य करणारे भारत झोडपे, डॉ. निखिल जाधव, अभिजीत सूर्यवंशी, रविंद्र पाटील सतिश प्रभु, अण्णा शेवाळे, अशोक बारबोठे आदिनी सहकार्य केले आहे.

तीन दिवसात तीन हजारा पेक्षा जास्त वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या शिबिरास आमदार विलास भुमरे, राज्य दुध संघाचे संचालक, नंदलाल काळे, राजेंद्र औटे, किशोर चौधरी आदींनी भेट दिली. शिबिर यशस्वीतेसाठी श्रीनाथ हायस्कूलचे प्राचार्य शिवाजी पठाडे, मुख्याध्यापक संतोष खरात, पवन खरात, प्रा. संतोष गव्हाणे, सुनील चितळे, अजित धस, प्रा. प्रवीण गोर्डे, पंढरीनाथ फुलझळके, लबडे, राजु सोनवणे आदि कर्मचारी प्रयत्न करत आहेत.