गल्लेबोरगाव येथे केली राठोड यांनी पाहणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी यापुढे सिमेंट बंधाऱ्यांची कामे करताना त्यावर ये-जा करण्यासाठी पुलाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केली.
सोमवारी (दि. १६) खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे भेट देऊन जलसंधारण विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बंधाऱ्यांमध्ये साठलेल्या पाण्याचा तसेच परिसरातील शेतीला होत असलेल्या प्रत्यक्ष फायद्याचा सविस्तर आढावा घेतला.
तालुक्यात यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली असताना, गल्लेबोरगाव परिसरात नव्याने बांधलेल्या या सिमेंट बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी अडत असले तरी पलीकडील दरम्यान, सिमेंट बंधाऱ्यांमुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण येत असल्याचे निदर्शनास आले. यावर सकारात्मक तोडगा काढत त्यांनी सिमेंट बंधाऱ्यांवर पूल उभारण्याची घोषणा केली.
यावेळी आमदार विलास भुमरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल खोसरे, दिलीप राजपूत, एकनाथ खोसरे, गोर सेना जिल्हाध्यक्ष दिगंबर राठोड, वाल्मीक राठोड, तुषार खोसरे, उपअभियंता वैभव चव्हाण यांच्यासह जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीसाठा झाला आहे. यामुळे मदत झाली. शेतीसाठी पाणी परिसरातील भूजलपातळी वाढण्यास उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.













