यूएईपासून अबूधाबी, कुवेत, कतार, बहरीनपर्यंत...इराणने 5 देशांवर डागले मिसाईल्स...

Foto
तेल अवीव : इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीही हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला केल्याचं इस्राइलकडून सांगण्यात  आले आहे. दुसरीकडे इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसंच शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. शिवाय लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

इस्रायलने जाहीर केली आणीबाणीची स्थिती

हल्ल्यानंतर इस्रायलने आणीबाणीची स्थिती जाहीर केली. गेल्या काही मिनिटांत, इस्रायलमध्ये सायरन वाजले आणि सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्यासाठी सेल्युलर उपकरणांना प्रगत सूचना देण्यात आल्या. इस्रायलकडे क्षेपणास्त्रे डागण्याची शक्यता असल्याने जनतेला तयार करण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे. आयडीएफने लोकांना सुरक्षित ठिकाणांजवळ राहण्याचे आवाहन केले आहे. तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 

सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम काय म्हणाले? 

इराणवरील इस्रायलचे हल्ले नियोजनबद्ध असून अमेरिकेला त्या ठिकाणी पूर्ण सत्तांतर करून घ्यायचे आहे. त्यामुळेच इस्रायलचे काही हल्ले तेहरानमधील आयातुल्ला खोमनेई च्या हेडक्वार्टर जवळ झाले आहे. इराणचा माजी राजा शहा सुद्धा इराणमध्ये परत येण्यास तयार आहे. मात्र, हे होत असताना रशिया आणि चीन आयातुल्ला खोमनेईच्या बाजूने युद्धात उतरले, तर जागतिक युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, अशी शंका संरक्षण तज्ञ मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, इस्रायल-इराण युद्धाच्या माध्यमातून मध्यपूर्व आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचे परिणाम भारतावरही होईल असे मेजर जनरल अनिल बाम म्हणाले.