समृद्धीवर सीएनजी पाईपलाईनला गळती

Foto
मध्यरात्रीपर्यंत महामार्ग बंद; वाहतुकीची कोंडी; सोलापूर-धुळे हायवेवर वाहतुकीचा भार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव शिवारात समृद्धी महामार्गालगतच्या गेल कंपनीच्या गॅस पाइपलाइनमधून शनिवारी (दि. २९) सायंकाळी गॅसची गळती सुरु झाल्याने समृध्दी महामार्गावरील वाहतुकीला ब्रेक लागला. ऐन वेळी वाहतूक सोलापूर-धुळे महामार्गावरून वळविण्यात आली. नागपूरकडे जाणारी वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल इंडियाचे पथक मुंबईहून रात्री उशिरा घटनास्थळी आले. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत गळती सुरुच होती आणि वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.
शनिवारी सायंकाळी गेलच्या गॅस लाइनमधून गॅस गळती सुरु झाली. रात्री आठच्या सुमारास हे प्रमाण वाढले. माळीवाडा परिसरात गेलच्या पाइपलाइनचे जंक्शन आहे. नागरिकांनी
फोन केल्यानंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या. संभाव्य धोका लक्षात घेता समृद्धी महामार्गावरील नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक तातडीने बंद केली. सर्व वाहने हडस पिंपळगाव, परिसरातून नागपूर मुंबई महामार्गाकडे वळवली. गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत
इंटरचेंजवरून वाहतूक वळविली
▶ समृद्धी महामार्गाच्या ाजूला गॅस पाईपलाईनला गळती लागल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक टोलनाक्यावर थांविण्यात आली होती. तसेच समृद्धीवरील इंटरचेंजवरही माहिती देऊन वाहतूक वळविण्यात येत होती.
पाइपलाइनचे व्हॉल्व्ह बंद केले, तरीही १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली गॅसची गळती सुरूच होती. मध्यरात्री नव्हती.
२४ किलोमीटर अंतरातील वाहतूक वळवली
▶▶ समृद्धी महामार्गालगत असणाऱ्या टाकळवाडी (ता. गंगापूर) येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली. खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यानची वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावरून वळवली आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी कळविले आहे. मुंबईकडून जाणारी वाहने हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून उतरून धुळे-सोलापूर महामार्गावर वळून माळीवाडा येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर येत होती. नागपूरकडून येणारी वाहने माळीवाडा इंटरचेंजवरून धुळे सोलापूर महामार्गावर येऊन हडस पिंपळगाव येथून पुन्हा समृद्धी महामार्गावर जात होती. गेल कंपनीच्या तज्ज्ञांनी रात्री दोन्ही बाजूकडील व्हॉल्व्ह बंद केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions