पैठण तालुक्यातील विकास कामांसाठी ३२ कोटी २६ लाखाचा निधी मंजूर

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील विविध गावातील रस्त्याच्या कामासाठी व शासकीय इमारतीच्या विकासासाठी आमदार विलास भुमरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३२ कोटी २६ लाखाचा निधी मंजूर करून घेतला आहे.

या निधीतून एकतुनी, थापटी, पारुंडी, बालानगर रस्त्याच्या कामासाठी कोटी ७५ लाख रुपये, पाचोड लिंबगाव हर्षी सोनवाडी, पारुंडी तांडा, आडुळ, मुरादाबाद, हर्षी ते सोनवाडी, आडुळ ते कॅनॉल रस्ता सुधार कामासाठी ५ कोटी, ढोरकिन कारकीन पोरगाव रस्ता सुधारकांसाठी, २ कोटी ७२ लाख, गेवराई
आ. विलास भुमरे यांच्या प्रयत्नाला यश, बोकुड जळगावनिलजगाव बोरगाव डोणगाव बालानगर नानेगाव खेर्डा रस्ता सुधारकाम करणे ३ कोटी ९० लाख रुपये, थेरगाव वडजी खंडाळा विहामांडवा ते हिरडपुरी रस्ता सुधार काम करणे ९३ कोटी ७० लाख रुपये, कातपुर वरुडी बालानगर रस्ता सुधार काम करणे ३ कोटी ७२ लाख रुपये, गारखेडा मलकापूर ते पिंपरी राजा डायगव्हाण सांजरखेडा पिंपळगाव रस्ता सुदर काम करणे १ कोटी ७२ लाख रुपये, शेवता तारू पिंपळवाडी बुट्टेवाडी बोरगाव धनगाव वडाळा ववा बालानगर तुपेवाडी, 
यासीनपुर ते दरेगाव रस्ता सुधारणा करणे ९१ कोटी ७५लाख रुपये, ढोरकिन ते ढाकेफळ लोहगाव शेकटा रस्ता सुधारणा करणे १ कोटी ७२ लाख रुपये, पिंपळगाव पांढरी ते बेंबळ्याची वाडी बेंबळ्याची वाडी नदीवर तुटलेल्या पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ९० लाख रुपये, पैठण खुले कारागृह येथे कारागृहातील बंदी जणांसाठी दहा बेड क्षमता असलेल्या नवीन हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम करणे ९९. ९९ लाख रुपये, विहामांडवा खुले कारागृह येथील कारागृहाच्या जागेवर तार कंपाउंड करणे, ९९.९९ रुपये, पैठण खुले कारागृह मधील बंदी जणांसाठी नवीन उपग्रह बांधणे ९९. ७५ लाख रुपये, वेस्टर्न टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम करणे १०. लाख रुपये, खुले कारागृह येथे बंदी जणांच्या मुलाखत साठी नवीन मुलाखत पक्षाचे बांधकाम ९७.६२लाख रुपये, खुले कारागृह येथील बंदी जणांसाठी संस्कृत कार्यक्रमासाठी व्यासपीठ बांधणे १० लाख रुपये, खुले कारागृह येथे संस्कृत कार्यक्रमसाठी शेडचे बांधकाम करणे १० लाख रुपये असे एकूण ३२.२६कोटी रुपये आमदार विलास भुमरे यांच्या प्रयत्नातून पैठण तालुक्याच्या विकासासाठी मिळाले आहे.