दररोज वाचनाशी नाते जुळवून आत्मविश्वासाने उभे राहण्याची शक्ती मिळवा : डॉ. संजय गायकवाड

Foto
पुस्तक दिनानिमित्त मल्हारराव होळकर आश्रम शाळेत प्रेरणादायी कार्यक्रम

सिल्लोड, (प्रतिनिधी) आयुष्यात वाधनाला अत्यंत महत्य आहे. पुस्तक आणि मस्तक याचा सातत्याने समन्वय साधला, तर माणूस आत्मनिर्भर बनतो आणि कोणासमोर नतमस्तक होण्याची वेळ येत नाही, एक असे प्रतिपादन डॉ. संजय गायकवाड यांनी केले. आडगाव निपाणी येथील मल्हारसाव होळकर आश्रम शाळेत पुस्तक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत होते.

ते पुढे म्हणाले की, शिक्षण बोत्रात कार्यरत असलेल्या संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक यांच्यात निस्वार्थी सेना व दानत वृत्ती असेल, तर त्या शाळेतील विद्यार्थी गुणवंत आणि यशस्वी होतात. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना स्वतः च्या पायावर उभे राहण्याची आवश्यक कौशल्ये विकसित होतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कष्टकरी व तळागाळातील पालकांची मुले प्रतिकूल परिस्थितीतही मोठी  स्वप्ने पाहतात.

 आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतात. भटक्या विमुक्त जमातीतील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उड़ेखनीय यश संपादन करत आहेत. त्यामुळे महामानव, समाजसुधारक आणि क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी जीवनमूल्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा ताराबाई कटके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आश्रम शाळेच्या मनीषा अर्जुन दसपुते यांची महसूल विभागात नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच सोनाली माने यांची जळगाव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास माने, उपसरपंच अशोक लोखंडे, पोलीस पाटील श्रीकांत हाके, अक्षय पाटील, बरडे, अहिरे, पूजा नेहाले, व्ही. सावंत, भगवान दसपुते, मीरा माने, शोमा दसपुते यांच्यासह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन मुख्याध्यापक देसले यांनी प्रभावीपणे केले, त्यांनी निवासी आश्रम शाळेत कार्य करताना येणाऱ्या अडचर्णीचा उल्लेख करत, त्यांवर मात करून ज्ञानदानाची अखंड तळमळ कशी जपली जाते, याचे मनोगत मांडले.