पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती
मध्यवर्ती कार्यालय
righ
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने डीजे व नशामुक्त संकल्पाने श्री गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी श्री गणेश महासंघ कार्यालय, निराला बाजार येथून भव्य विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ पारंपरिक वाद्यांच्या गजरात शुक्रवारी (दि. २५) अनंत चतुर्दशीला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार, राज्याचे मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, माजी विधान परिषद विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे, महापौर समीर राजूरकर, मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, जिल्हाधिकारी विनय गौडा, विभागीय आयुक्त जी.
श्रीकांत, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी उपमहापौर राजु शिंदे, सुभाष पाटील, तनसुख झांबड, राजु बागडे, डॉ. बाळासाहेब थोरात, राजेंद्र दानवे, संदिप बोरसे, माजी अध्यक्ष डी. एन. पाटील, अभिषेक देशमुख, कृष्णा बनकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सचिन अंभोरे यांनी केले. तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













