सिल्लोड (प्रतिनिधी) गणेश चतुर्थीनिमित्त सिल्लोड शहरात गणरायाचे थाटात आगमन झाले. विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
यामुळे शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे निर्माण झाले होते. वातावरण शहरातील युवा व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री गणेशाचे पूजन करण्यात आले.
यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीदरम्यान युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी तालुका गणेश महासंघाचे अध्यक्ष केशवराव पा. तायडे, कार्याध्यक्ष नंदकिशोर सहारे, कृउबा समितीचे सभापती सतीश ताठे, किशोर अग्रवाल, राजेंद्र ठोंबरे, सुदर्शन अग्रवाल, मनोज झंवर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, गणेश महासंघाचे पदाधिकारी सुधाकर पाटील, विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, जितू आरके, गणेश सयाजी वाघ, विशाल जाधव, मधुकर बेंडाळे, आशिष कटारिया, अक्षय मगर, कुणाल सहारे, संजय फरकाडे, गौरव सहारे, संतोष खैरणार, मानसिंग राजपूत, रवींद्र दाणी, सुनील इंगळे, राहुल काळे, जीवन सोनवने, गणेश ढोरमारे आदींसह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.














