मंकी कॅप घालून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Foto
साजवार्ता
Page No.: 3 Date: 28/11/2026
११ गुन्हे उघडकीस : ८ लाखांचा मुद्देमाल जप्त; सराफालाही अटक
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सिडको आणि हसूल परिसरात मंकी कॅप घालून रात्रीच्या अंधारात घरफोडी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सराईत चोरट्यांसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या एका सराफाला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणून ७ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिडको पोलीस ठाण्यातील घरफोडीच्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने फकीरवाडीतील नईम शाह उर्फ चुन्नू उस्मान शाह आणि रहीम नगरमधील सुभान शेख इसाक शेख यांना ताब्यात घेतले. कसून चौकशीत दोघांनी सिडको व हर्सल भागात घरफोडी (८ गुन्हे), शटर उचकटणे (१), उघड्या घरातून चोरी आणि गुन्ह्यांसाठी हसूलमधून दुचाकी चोरल्याची
कबुली दिली.
या कारवाईमुळे सिडको ठाण्यातील ८ आणि हर्सल ठाण्यातील ३ गुन्हे उघडकीस आले असून, इतर दोन गुन्ह्यांतही त्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. पुढील तपासासाठी तिन्ही आरोपींना सिड को पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सराफाकडून २० ग्रॅम सोने जप्त
तपासात असे समोर आले की, मुख्य आरोपी नईम शाह चोरलेले दागिने फकीरवाडीतील आपल्या दुसऱ्या पत्नीच्या घरी लपवून ठेवत असे. हे सर्व दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तसेच, सुभान शेखकडून चोरीचा एक टॅब आणि दुचाकी (एमएच २० जीडी ६१६०) जप्त करण्यात आली. याशिवाय नईमने चोरीचे सोने शहागंज येथील सराफ शेख मोहसिन शेख जाफर (रा. बायजीपुरा) याला विकले होते. पोलिसांनी त्या सराफालाही बेड्या ठोकून २० ग्रॅम सोने जप्त केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions