गंगा आरतीला एक वर्ष पूर्ण

Foto
भाविकांच्या उपस्थितीत वर्षपूर्ती सोहळा उत्साहात
 
पैठण, (प्रतिनिधी): दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पैठण येथे गोदावरी तीरावर दररोज सुरू करण्यात आलेल्या गंगा आरतीला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने भाविकांच्या उपस्थितीत हा वर्षपूर्तीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.


पूर्वी गंगा आरतीचा सोहळा प्रामुख्याने काशी येथेच पाहायला मिळत होता; मात्र नाथ संस्थानच्या पुढाकारातून पैठण येथील पवित्र गोदावरी नदीवरही गंगा आरती सुरू करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना नाथ संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे यांनी मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या उपक्रमाला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज संध्याकाळी गोदावरी घाटावर होणाऱ्या या गंगा आरतीला महाराष्ट्रातील विविध भागांतून भाविक उपस्थित राहतात. अनेक भाविकांच्या हस्ते आरती करण्यात येते. 

त्यामुळे पैठण नगरीत दररोज भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे. सोमवारी ९ मार्च रोजी गंगा आरतीच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमळनेर संस्थानचे मठाधिपती हभप प्रसाद महाराज अमळनेरकर, आमदार विलास भुमरे, नगराध्यक्षा विद्या भुषण कावसानकर, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, राज्य दूध संघाचे संचालक नंदू आण्णा काळे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेवक ईश्वर दगडे, गोवर्धन टाक, माजी नगरसेवक भुषण कावसानकर, शेखर शिंदे, जालिंदर अडसूळ, शिवराज पारीख, गणेश वरकड, सुनिल हिंगे, कृष्णा मापारी, जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे, सतीश आंधळे, अनिकेत धारकर नामदेव खरात, पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पैठण ही संतांची आणि आध्यात्मिक परंपरेची भूमी आहे. काशीप्रमाणेच येथे गोदावरी तीरावर दररोज गंगा आरती व्हावी, हा आमचा मानस होता. भाविकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. वर्षभरात हजारो भाविकांनी या आरतीचा लाभ घेतला आहे. पुढेही हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात अखंडपणे सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न अणार आहे.
- विलास भुमरे, आमदार, पैठण