गंगापूर न. प. निवडणूक : नगराध्यक्षासाठी १५; नगरसेवकांसाठी १२८ अर्ज दाखल

Foto
महाविकास आघाडी तसेच महायुती न झाल्यामुळे कार्यकर्ते झाले उमेदवार, चौरंगी लढतीचे संकेत;
काही पक्षांना सर्व प्रभागांत उमेदवारही मिळाले नाही

गंगापूर, (प्रतिनिधी) ; नगर परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अखेरचे दोन दिवस शिल्लक होते, तेव्हा नामांकन केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. रविवारी (दि. १७) हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यकर्ते उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. महाविकास आघाडी व महायुती न झाल्यामुळे कार्यकर्ता झाले उमेदवार अशी परिस्थिती होती. 

यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांची निवड थेट जनतेतून होत आहे. एकूण १० प्रभागांतून प्रत्येकी दोन, अशा २० नगरसेवक पदांसाठी उमेदवारी दाखल झाली, गंगापुर नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्वबळाचे अस्त्र उगारले आहे. भाजपच्या उमेदवारांनी आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले.

गंगापूर नगराध्यक्षपदासाठी दाखल : 
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष पदासाठी प्रदीप पाटील यांनी भाजप व अपक्ष असे तर अविनाश पाटील यांनीदेखील उद्धवसेना व एक अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. माजी आमदार कैलास पाटील यांचे सुपुत्र बाजार समितीचे ऋषिकेश पाटील यांनी शिंदेसेनेकडून अध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली. वंचित बहुजन आघाडीकडून सागर मवार यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. 

भाजप - शिंदेसेनेची युती फिस्कटली :
युतीमध्ये शिंदेसेना व भाजप यांच्यात जागा वाटपावरून बोलणी फिस्कटल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार अण्णासाहेब माने व माजी आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत घोषणाबाजी करून आपले अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी ६९ नगरसेवक आणि ६ नगराध्यक्ष पदाचे अर्ज नगराध्यक्ष पदासाठी ६ अर्ज नगरसेवक पदासाठी ६९ अर्ज तिन्ही दिवसांत एकूणा नगराध्यक्ष पदासाठी १५ अर्ज नगरसेवक पदासाठी १२८ अर्ज नगरसेवकांसाठी दाखल अर्जामध्ये महिला ६८ पुरुष ६० प्रभागवार अर्ज प्रभाग १० सर्वाधिक १८ अर्ज प्रभाग ३ सर्वात कमी अर्ज 

कोणत्या पक्षाचे किती अर्ज दाखल झाले ?
पक्ष
नगरसेवक
नगराध्यक्ष
राष्ट्रवादी (अजित पवार गट) २०
भाजप
२२
एकनाथ शिंदेसेना १७
काँग्रेस
१५
उद्धव सेना
१५
राष्ट्रवादी (शरद पवार)
एमआयएम
अपक्ष
२८
बंचित
० 
महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र
लढणार असल्याचे स्पष्ट :
गंगापूर येथील नगर पालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात सत्तेत असलेल्या शिंदेसेना व भाजपाने स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी ६ जणांनी तर सदस्य पदासाठी ६९ जणांनी अर्ज दाखल केले. नगर पालिका निवडणुकीसाठी महायुतीतील अजित पवार गटाचे राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच फारकत घेतल्याने त्यांनी आपला सवतासुभा मांडत नगराध्यक्ष पदासह सर्व २१ उमेदवार जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे. पालिका निवडणूक एकत्र लढण्याचे काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने जाहीर केले होते. मात्र त्यांच्यातही केवळ नगराध्यक्ष पदाच्या जागेवरून शेवटपर्यंत सूत न जुळल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धवसेना व काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागांत स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.

वंचित कडून सदस्यासाठी एकही अर्ज नाही:
विशेष म्हणजे वंचित कडून सदस्य पदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकही अर्ज आला नाही. काही पक्षांना सर्व प्रभागांत उमेद्वार मिळाले नाहीत. तर प्रमुख पक्ष भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना व काँग्रेस यांचीही उमेदवारीसाठी ऐनवेळी धावपळ करायला लागलो. तर उमेदवार बरोबर असलेले कार्यकर्ते झाले, उमेदवार दमछाक झाली.

गंगापूरात राजकीय आघाड्यांची उलथापालथ :
गेल्या निवडणुकीत एकत्र असलेली महा यूली (भाजप शिंदे सेना राष्ट्रवादी अजित गट) या वेळी फिसकटली असून तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आधाडीतही दरी निर्माण होऊन उबाठा शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे. काँग्रेसराष्ट्रवादी (शरद पवार गट) मुली मजबूत राजकीय अस्थिरतेत काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यानी मात्र त्त्पष्ट युती केली आहे. समायोजनानुसार नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे मोहसीन चाऊस यांना उमेदवारी दिली आहे.