गंगापूर रमजान ईद निमित्त नमाज पठण उत्साहात

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): गंगापूर शहरासह तालुक्यात रमजान ईद (ईद-उल-फितर) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पवित्र सणानिमित्त विविध ईदगाह व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज अदा केली.

दारुसलाम मस्जिद, त्रिकोणी चौक येथे सकाळी ८.०० वाजता मौलाना चाँद पाशा यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. मस्जिद नसीम नजीर ८:३० नमाज पठण झाले. त्यानंतर जुनी ईदगाह येथे ८.३० वाजता मौलाना युसुफ मौलवी यांनी नमाज अदा केली. नवीन ईदगाह येथे सकाळी ९.०० वाजता मौलाना मुबीन शेख (तब्लिग जमात अमीर) यांच्या नेतृत्वाखाली नमाज पार पडली. तसेच जामा मस्जिद, गंगापूर येथे ९.३० वाजता मौलाना आसिफ पटेल यांनी नमाज पठण केले. गंगापूर तालुक्यातील शहरासह आगरवाडगाव, जामगाव, ढोरेगाव, भालगाव, गोळेगाव, लासूर स्टेशन आदी ठिकाणीही ईदगाह व मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव
उपस्थित होते. 

यावेळी प्रशासनातील नायब तहसीलदार सचिन वाघमारे, पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, नगराध्यक्ष संजय जाधव, उपनगराध्यक्ष अमोल जगताप नगरसेवक सुरेश नेमाडे, गटनेते संतोष अंबिलवादे, विशाल गायकवाड, नवनाथ कानडे, सय्यद अख्तर, मुनाफ कुरेशी, सोपान देशमुख, अनिस कुरेशी, डॉ आबासाहेब शिरसाट, विश्वजीत चव्हाण, सुनील घाडगे, मुकुंद जोशी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, विठ्ठल झांजुर्णे, गोपनी शाखाचे मनोज नवले, भागवत खाडे, गंगापूर तलाठी गणेश लोणे यांनी ईदच्या यांच्यासह व
पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देन्यात आल्या आहेत.

याप्रसंगी गंगापूर शहरातील जमीत अमिर मौलाना मुबीन साहब, माजी नगरध्यक्ष फैसल चाऊस, नगरध्यक्ष मोहासीन चाऊस, माजी उपध्यक्ष खालेद नाहदी, पत्रकार अलिम चाऊस, महमद तंबोली, सय्यद यूसुफ, समाजवादी तालुकाध्यक्ष मुसा खॉन, सय्यद अख्तार, शेख बुहान फिटर, हनिफ बागवान, नईम मन्सुरी, नदीम बागवान, लाला शेख, पत्रकार अनवर बागवान, लालाखा पठाण, बाबा बनों बागवान, अनिस कुरैशी, बदर जहुरी, रिजवान पठाण, रशिद कुरैशी, अजीम शेख, काजी मंजुर सिद्दीकी, अहमेद शेख, अलिम कुरैशी, गुड्डा बागेस, यासेर बाकोदा, जुबैर पठाण, अजीम कुरैशी, शहर अध्यक्ष एम. आय. फैसल बासालाने, अ. रहीम बागवान, शेरू शहा, सय्यद नवाज, रशीद शेख, एजाज मन्सुरी, हमद बाकोदा, शेख महमद, शेख रशिद, एकबाल सिद्दीकी, बाबु मनियार, मुजीब बागवान, सलमान मनियार, शोशमशेर पठाण, वसोद चाऊस, समीर शेख, सलिम चाऊस, इरफान चाऊस, जुबैर सिद्दीकी, राजमहमद शेख यांनी नमाज अदा केली. यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 

त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शहरातील अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नमाज अदा केली. तसेच गंगापूर पोलिसांकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच, गंगापूर शहर व तालुक्यात रमजान ईद शांतता, उत्साह आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.