गंगापूर : पंचगंगा कारखान्यासमोर भीषण अपघात दोन ठार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : भरधाव मालवाहू ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. हा अपघात गंगापूर- वैजापूर रोडवरील पंचगंगा साखर कारखान्यास समोर आज (दि.15) सकाळी झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, भरधाव जाणारी मालवाहू ट्रक (टी एस 15,यु डी -2415) व दुचाकी (एम एच 03, ई एक्स- 5874) यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकी स्वार ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गंगापूर वैजापूर रस्त्यावरील पंचगंगा कारखान्यासमोर रात्री एक वाजेच्या सुमारास झाला. अपघातात ठार झालेले दुचाकी स्वार श्रीरामपूर साईडचे असल्याचे समजते. या भीषण अपघाताबाबत रोष व्यक्त करत आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
 

संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको...

गंगापूर वैजापूर मार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची वाहतूक सुरू असल्याने दररोज लहान मोठे अपघात होतात. अपघाताची ही मालिका सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघात होऊ नये आणि वाहनधारकांचा जीव सुरक्षित रहावा. म्हणून रस्ता रुंदीकरण करून रस्त्याला डिव्हायडर घालण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.