गंगापूर, (प्रतिनिधी) : अवैध दारूविक्री व विनापरवाना दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाया करत दोन जणांना ताब्यात घेतले. मालुंजा येथे विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या देशी दारूच्या १९२ बाटल्या, सिरसगाव फाटा येथे बॅगेतून वाहून नेण्यात येणाऱ्या देशी विदेशी दारूच्या २३ बाटल्या असा एकूण २१५ बाटल्या, २३ हजार १०० रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. -
मालुंजातील मेंढी भालगावकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर अंबादास बरबडे यांच्या फ्याच्या शेडलगत केली. महावीर रघुनाथ आघाडे (वय ३५, रा. सिस्सगाव) हा विनापरवाना देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता त्याच्याकडे देशी दारूच्या १८० मिलीच्या १९२ सीलबंद बाटल्या
आढळून आल्या. या साठ्याची किंमत १९ हजार २०० रुपये, गंगापूर लासूर रोडवरील सिरसगाव फाटा येथे केली.
पाठीवर बॅग घेऊन जाणाऱ्या मंजू दुमसिया ब्राह्मणे (वय २६, रा. गोदल्या पाणी, पोस्ट कुंजारी, ता. निवाली, जि. बडवाणी, मध्यप्रदेशः हल्ली मुक्काम मालुंजा) याच्यावर पोलिसांना संशय आल्याने त्याची बॅग तपासली. त्यामध्ये विदेशी दारूच्या आठ बाटल्या व देशी दारूच्या १५ बाटल्या, असा एकूण तीन हजार २०० रुपांचा दारूसाठा आढळला. या कारवायांमध्ये देशी दारूच्या २०७, विदेशी दारूच्या आठ अशा एकूण २१५ बाटल्या जप्त केल्या.
दारू बाळगण्याचा अथवा विक्रीचा परवाना नसल्याने गुन्हे दाखल केले. ही कारवाई हवालदार पदम जाधव, गणेश जाधव, भागवत खाडे व महिला पोलिस कर्मचारी रेणुका धारकर यांच्या पथकाने केली. दोन्ही प्रकरणांचा तपास अनंत पाचंगे करत आहेत.















