गंगापूर तालुक्यात सरासरी २१.६६ मि.मी. पाऊस

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी)  :  सरासरी २१.६६ तालुक्यातील १२ महसूल मंडळांमध्ये मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानंतर झालेल्या या पावसामुळे खरीप पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. यापूर्वी दोन तीन दिवस तालुक्यात केवळ हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या वाढीबाबत शेतकरी चिंतेत होते. या परिसरातील मातीतील ओलावा कमी पडत असल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी आदी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतांना पुरेसा ओलावा मिळण्यास सुरुवात झाली असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. 

अशा परिस्थितीत ३१ जुलैचे मंडळनिहाय पर्जन्यमान (मिमी)
गंगापूर
१०
मांजरी
१८
भेंडाळा
२६
सिद्धनाथ वडगाव
०२
डोणगाव
१७
हर्सल
१६
शेंदूरवादा
४५
वाळूज
४२
तुर्काबाद।
४०
गाजगाव
१५
जामगाव
११
आसेगाव।
१८
एकूण पर्जन्यमान २६० मिमी तालुक्याची सरासरी २१.६६ मिमी

गंगापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही भागांत अद्याप ओढे नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागले नसले, तरी पाणीसाठ्यांमध्ये वाढ होण्याची आशा निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मते, पुढील काही दिवसही अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास खरीप हंगामासाठी तो अत्यंत लाभदायक ठरणार आहे.