गंगापूर तहसील कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): महसूल विभागामार्फत २०२५ २६ या वर्षात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संभाजीनगर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात गौरव करण्यात आला.

गंगापूर तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी सचिन भिंगारे, महसूल सहाय्यक गजानन चिपडे, महसूल सेवक कलीम नुर शेख (उपविभाग वैजापूर) तसेच शिपाई भंडारी यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयाच्या विक्रमी हॉल, सिडको, संभाजीनगर येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता हा सत्कार सोहळा पार पडला. 

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महसूल विभागातील विविध कामकाजात उत्कृष्ट कामगिरी बजावून नागरिकांना तत्पर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

 गंगापूर तहसील कार्यालयातील चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गौरवामुळे तहसील कार्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. या