गंगापूर नगराध्यक्षांनी सुत्रे हातात घेताच सुरु केली स्वच्छता मोहिम

Foto
 नागरिकांमध्ये उत्साह

गंगापूर (प्रतिनिधी): गंगापूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पदभार स्वीकारताच शहरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले असून, प्रत्येक प्रभागात जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. 

या कामामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. चार वर्षांपासून नगर पालिकेवर प्रशासकाची राजवट असल्याने शहरातील अनेक प्रभागांमध्ये कचरा, सांडपाणी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर जनतेने कौल दिला.

जनतेने संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष व नगरसेवकांची निवड केली.
निवडणुकीदरम्यान दिलेल्या शब्दानुसार नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजय जाधव आणि नगरसेवकांनी थेट रस्त्यावर उतरून आपल्या आपल्या प्रभागात स्वच्छतेची जबाबदारी हातात घेतली आहे. काही ठिकाणी नगरसेवक स्वतः उपस्थित राहून स्वच्छता कामकाजावर देखरेख करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे मन्सुरी कॉलनी येथे प्रभाग क्रमांक ६ येथील नवनिर्वाचित नगरसेवक अख्तर सय्यद, जुना डाग बंगला पोस्ट ऑफिस जवळ प्रभाग क्र. ८ मध्ये माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस यांच्या घराजवळील गल्लीत दीर्घकाळ स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या.

मात्र, निवडणुकीनंतर नगरसेवक फैसल चाऊस व सय्यद अख्तर यांनी पुढाकार घेत गंगापूर नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित परिसरात स्वच्छता करून घेतली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये नियमित स्वच्छता, कचरा उचल, आणि सांडपाणी निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पूर्ण करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम केवळ काही दिवसांची नसून सातत्याने सुरू राहील. व्यवस्थापनावर लक्ष दिले जात असल्याने गंगापूर शहर स्वच्छ व आरोग्यदायी होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

- संजय जाधव, नगराध्यक्ष, गंगापूर नगरपालिका प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन तातडीने स्वच्छता करण्यात आली आहे. नगरपालिका कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी मिळून प्रभाग स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.  
- फैसल चाऊस, नगरसेवक, प्रभाग क्र. ८

शहरातील सर्व प्रभागांमध्ये कचरा उचल, नालेसफाई आणि रस्ते स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनीही कचरा व्यवस्थापनात सहकार्य करावे.
- संतोष आगळे, गंगापूर नगर पालिका, मुख्याधिकारी

काही वर्षांपासून अस्वच्छतेचा त्रास होता. नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रत्यक्ष काम सुरू केल्यामुळे गंगापूर शहरात बदल दिसून येत आहे.
- भाई समीर पठाण, गंगापूर  

दृष्टीने दिलासा मिळाला आहे. अशीच कामगिरी कायम राहावी, ही अपेक्षा ज्येष्ठ नागरिक स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याने आरोग्याच्या आहे.
- जमीर शेख, गंगापूर