गंगापूर पोलिसांची धडक कारवाई : ११ गोवंशांना जीवदान

Foto
२ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त

गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धडक कारवाई करत ११ गोवंशांना जीवदान दिले. चमनपुरा परिसरातील एका ठिकाणी गोवंशांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी एका गोवंशाची कत्तल करण्यात आल्याचे उघड झाले असून घटनास्थळी सुमारे २०० किलो गोमांस आढळून आले. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून गोवंशांना अमानुष पद्धतीने दाटीवाटीने बांधून वे ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी व वेळेत छापा टाकल्याने ११ गोवंशांची कत्तल टळली. या प्रकरणी पोलीस अमलदार प्रवीण केशव ड प्रधान यांच्या फिर्यादीवरून मन्नान हरून कुरेशी, २ मुज्जू कुरेशी, मोईन अमीर कुरेशी आणि शन्या शब्बीर पठाण (रा. चांदा, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात
गंगापूर पोलिसांनी विविध जातींच्या गाई, गोरे, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे सुरे, धार लावण्याचे न साहित्य तसेच २०० किलो गोमांस जप्त केले. 

जप्त जनावरांमध्ये जर्सी, गावरान, खिल्लार आणि गीर जातींच्या गायींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गोवंशांना आखूड दोरीने बांधून ठेवत अन्न-पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून मांस विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

ही कारवाई २२ मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चमनपुरा परिसरात करण्यात आली. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित पाटील हे पुढील तपास करत आहेत. या धडक कारवाईमुळे गंगापूर शहरातील अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून नागरिकांकडून गंगापूर पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.