गंगापूर (प्रतिनिधी): ऐन दिवाळीच्या सणात शहरातील अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. नगर परिषदेच्या पथदिवे बंद असल्याने नागरिकांना सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शहरप्रमुख भाग्येश गंगवाल यांनी स्वतःच्या खर्चातून विविध प्रभागांमध्ये पथदिवे लावण्याचे काम हाती घेतले आहे. नागरिकांकडून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.