छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ऑटो रिक्षांसाठी वापरला जाणारा आणि तब्बल १२५ रुपये प्रति लिटरपर्यंत दर वधारलेल्या एलपीजीचा दर आजपासून आटोक्यात आला आहे. बुधवारी (दि.८) सकाळी ६ वाजेपासून 'गो गॅस'ने ९९ रुपये प्रतिलिटर दराने विक्री करणार असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.
मध्यपूर्व देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या परिणामी एलपीजी गॅसचा तुटवडा झाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरसह ऑटो रिक्षासाठी वापरला जाणारा एलपीजीदेखील मिळत नाही. दरम्यान, केंद्र शासनाकडून घरगुती गॅस सिलिंडर पुरवठ्याला प्राधान्य देत सिलिंडर उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र ऑटो रिक्षांसाठीचा एलपीजीचा शहरात अद्याप तुटवडा कायम आहे. शहरातील एलपीजी पंप बंद आहेत. जी सुरु आहेत त्यावर लांबच लांब रांगा आहेत. दरातही वाढ झाली आहे. युद्धापूर्वी ६० ते ८० रुपये प्रतिलिटरने मिळणार एलपीजी आजघडीला १२५ रुपयांपर्यंत गेला होता. वाढीव दरामुळे ऑटोचालक अथक अडचणीत आलेले आहेत. दरम्यान, गो गॅसने आपले दर आजपासून
शहरात चार गो गॅस पंप
▶ सूत्रांच्या माहितीनुसार,
छत्रपती संभाजीनगर शहरात गो गॅसचे चार पंप कार्यरत आहेत. यात एएस क्लब वाळूज, बजाज रुग्णालयाजवळ, चिकलठाणा आणि चितेगाव येथे हे पंप आहेत. या पंपांवर आजपासून ९९ रुपये प्रति लिटर दराने एलपीजी उपलब्ध असणार आहे.
९९ रुपये प्रति लिटर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑटो चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मंगळवारी गो गॅस पुरवणाऱ्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडने सर्व स्टेशन पर्यवेक्षकांना पत्र जारी केले आहे. पत्रात म्हटले आहे की, राज्यातील सर्व डिस्पेंसिंग स्टेशनवर हा किरकोळ आणि तात्पुरता बदल करण्यात आला आहे. यानुसार एलपीजीचा सुधारित दर ९९ रुपये प्रति लिटर करण्यात आला असून आज बुधवार, सकाळी ६ वाजेपासून हे दर लागू होतील असे पत्रात म्हटले आहे. या निर्णयामुळे हजारो ऑटो चालकांना दिलासा मिळणार आहे.













