महिला अधिकाऱ्याला अश्लील मेसेजसह व्हिडिओ पाठवून मुलीची बदनामी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : नसरापुर सारखे हालहाल करून मारून टाकीन अशी धमकी विहामांडवा येथील महिला मंडळ अधिकारी यांना देणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष विरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटने मुळे एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदरील पदाधिकारी हा ५ मे पासून सदरील मंडळ अधिकारी यांना मी अनमॅरीड आहे मला एकदा पर्सनल भेट असे म्हणत अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवून तात्काळ डिलीट करत होता. दहा दिवसापासून संबंधित मंडळाधिकारी हा मनस्ताप सहन करीत होत्या. शेवटी सदर महिलेने१५ मे रोजी पाचोड पोलीस स्टेशन गाठून युवराज चावरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तक्रारदार महिलाही तालुक्यातील विहामांडवा येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मी माझे दैनंदिन काम करत असताना मला५ मे रोजी कोळी बोडखा येथील युवराज चावरे याने मोबाईल वरून कॉल केला व म्हणाला की मी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष आहे. तू माझे काम का करत नाही. तुझ्या विरोधात आलेल्या बातम्यांचे कात्रण तुला पाठवले आहे मी जे काम सांगेल ते तुला करावेच लागेल. 
यापुढे मी तुला दररोज मानसिक त्रास देणार आहे. ९ मे रोजी रात्री २.३२ वाजता युवराज चावरे यांने मोबाईल वरून अश्लील मेसेज करून काही अश्लील व्हिडिओ पाठवले व काही डिलीट केले. तत्पूर्वी ९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता युवराज चावरे याने तहसील कार्यालयात जाऊन धक्काबुक्की करत मला शिवीगाळ केली. म्हणाला की तुझी मुलगी घरी एकटीच असते तिला सुद्धा मी गायब करीन व पुणे जिल्ह्यातील नसरापुर सारखे हालहाल करून मारून टाकीन अशी धमकी दिली. 

यानंतर सदरील महिलेने मोबाईल वरील कॉल डिटेल्स व सोशल मीडियावरील मेसेज चे पुरावे गोळा करून पाचोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक राम बाराहाते हे तपास करत आहेत.