पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय वायुसेनेने आज सकाळी घेतला. पाकिस्तानातील बालकोट या भागात सकाळी ३: ३० वाजता भारतीय वायुसेनेच्या मिरज या विमानांनी बॉम्बवर्षाव केला. यामध्ये २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले असण्याची शक्यता आहे. भारतीय वायुसेनेने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचे देशभर कौतुक होत आहे. आम आदमी पक्षाचे एकेकाळी प्रमुख चेहरा असलेले प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी भारतीय वायुसेनेचे कौतुक करण्याबरोबरच भारताने २०१६ मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना टोमणा मारला आहे. या हल्लयाचे जे पुरावे मागेल त्याच्या हातावर १०० ते २०० ग्रामचे बॉम्ब द्यावे असे विश्वस यांनी म्हटले आहे.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एयर स्ट्राईकची बातमी समोर आल्यानंतर कुमार विश्वास यांनी ट्विट करून पुरावे मागणरायाना चांगलीच चपराक लगावली. याबरोबरच, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर देखील त्यांनी टीकास्र डागले आहे. शांततेचा पांढरा रंग इम्रान खान यांना पसंद नाही. त्यामुळे त्यांना आवडणार्या लाला रंगाच्या भाषेत भारताने प्रत्युत्तर दिल्याचे विश्वास यांनी म्हटले आहे.