औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहर आहे. अनेक पुरातन वास्तुमुळे जगभरातील पर्यटक औरंगाबाद मध्ये येत असतात. औरंगाबादच्या या वैभवात आणखी एक मनाचा तुरा खोवला गेला आहे. रिझर्व्ह बँकेने नव्याने जारी केलेल्या वीस रुपयांच्या नोटेवर औरंगाबादच्या वेरूळ लेणीची छायाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे औरंगाबादच्या वेरूळ लेण्या जगभर पोहचण्यास मदत होणार असून यामुळे औरंगाबादच्या पर्यटकांमध्ये देखील लक्षणीय वाढ होऊ शकते. सर्वसामान्य औरंगाबाद वासियांसाठी नक्कीच ही गौरवास्पद बाब आहे.