गोठ्यातून ६० हजारांच्या बकऱ्या चोरीला

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथे गोठ्यात बांधलेल्या ६० हजार बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. 

या चोरीत शेतकऱ्याचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अण्णा कचरू गव्हाड (५०, रा. तळेगाव, ता. फुलंब्री) यांचे राजूर-फुलंब्री रोडलगत गट क्रमांक ४१ मध्ये घर व गोठा आहे. ते बकऱ्या पाळण्याचा व्यवसाय करतात. १८ सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता
असता चार बकऱ्या गायब ते छत्रपती संभाजीनगरहून घरी परतले. 

त्यावेळी गोठ्यात चार बकऱ्या व एक वासरू बांधलेले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास वासराच्या आवाजाने ते जागे झाले. गोठ्यात जाऊन पाहिले असल्याचे निदर्शनास आले. चोरलेल्या बकऱ्यांची एकूण किंमत ६० हजार रुपये आहे. परिसरात शोध घेऊनही त्या मिळाल्या नाहीत. यापूर्वीही याच ठिकाणाहून गाय चोरीला गेल्याचे गव्हाड यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

-- तळेगाव परिसरात शेतकऱ्यांत घबराट -- 
आधीत पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच तळेगाव आणि परिसरात जनावरे चोरणारी टोळी सक्रीय झाल्याने शेतकरी भयभीत आहेत. शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायी, वासरे शेळ्या यांना ही टोळी लक्ष्य करीत आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त घालावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबूराव गव्हाड यांनी केली आहे.