गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पावणे दोन लाख आवक सुरू

Foto
१ लाख ६० हजार ३४४ क्यूसेक विसर्ग सुरू 

आमदार विलास भुमरे यांनी घेतली परिस्थितीची माहिती 

रमेश लिंबोरे , पैठण, 
नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने नाथसागर जलाशयाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून नाथ सागर जलाशयात १ लाख ६८ हजार ३५३ क्यूसेक पाणी दाखल होत असल्याने गोदावरी नदीच्या पत्रात १ लाख ६० हजार ३४४ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाण्याची आवक लक्षात घेता यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैठण शहरासह तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आमदार विलास भुमरे यांनी नाथसागर जलाशयावर जाऊन पूर परिस्थिती माहिती घेतली आहे. तहसील प्रशासन नगरपालिका प्रशासन यांना नागरिकांना सुविधा उपलब्ध देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पर्याय व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान नागरिकासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून नाथा हायस्कूल, अभिनंदन मंगल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जवळील शासकीय गोदाम येथे व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक दुकानदार आपले सामान हलवताना दिसत आहेत.