परिसरातील गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून, सातारा परिसरातील आयप्पा मंदिर भागात एका बंद : शहर घरातून अज्ञात चोराने तब्बल ४ लाख रुपये किमतीचे सान्या -चांदीच दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नलिनी पवन काळे (वय ४०, रा. आयप्पा मंदिर परिसर, सातारा) या दिनांक १ मे ते ९ मे २०२६
दरम्यान कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. या कालावधीत त्यांचे घर बंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोराने घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून चोराने पोबारा केला.
अर्धा किलो चांदीही लंपास चोरी गेलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी, ३० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, तसेच सोन्याचे पिळा (तुकडे) आणि २५ हजार रुपये किमतीचे अर्धा किलो वजनाचे चांदीचे शिक्के, असा एकूण ४ लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions