सोन्याचा दिलासाच नाही, किमतींनी आणखी वाढवली धडधड; आजचे १० ग्रॅमचे दर वाचून..

Foto
नवी दिल्ली : आठवडा संपत आला तरी सोन्याने काही ग्राहकांना दिलासा दिला नसून शनिवारीही देशातंर्गत सोन्याचे भाव चढेच राहिले. सराफा बाजारात मोठ्या घडामोडी घडत असून विविध शहरातील सोन्याचे भाव वाढले आहेत. ४ जुलैच्या सकाळी बहुतेक शहरांमध्ये २४ कॅरेट आणि २२ -कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली. राजधानी दिल्लीत २४ -कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,१६० रुपयांवर पोहोचला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ % शुद्ध सोन्याच्या दरात ३३०० रुपयांची वाढ होऊन तो प्रति १० ग्रॅम १,५०,८०० रुपयांवर पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वधारल्यामुळे आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ङ्गस्पॉट गोल्डफचा भाव प्रति औंस ४,१८१.५० डॉलर्स इतका आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
राजधानी दिल्लीमध्ये २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,१६० रुपये आहे. तर २२-कॅरेट सोन्याची किंमत दर प्रति १० ग्रॅम १,३४,९१० रुपयांवर पोहोचली आहे. आर्थिक राजधानी मुंबई आणि कोलकातामध्ये २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३४,७६०१,३४,६७० रुपये असून २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी १,४७,०१० मोजावे लागतील.

चकाकणार्‍या सोन्याची किंमत चेन्नईमध्ये सर्वाधिक आहे. तिथे २४ कॅरेट सोनं १,४९,५७० रुपये २२ कॅरेटचे सोनं १,३७,०१० रुपयांना मिळतंय. पुणे आणि बंगळुरू या दोन्ही शहरांमध्ये २४-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,०१० रुपये आहे आणि २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३४,७६० रुपये आहे.

चांदीचे दर किती
सोन्याप्रमाणेच, आणखी एक मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आह. शनिवार, ४ जुलैच्या सकाळी चांदीचा भाव वाढून प्रति किलो २,५०,१०० रुपयांवर पोहोचला. औद्योगिक क्षेत्र आणि गुंतवणूकदार या दोघांकडूनही वाढलेल्या मागणीमुळे चांदीचे दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात ङ्गस्पॉट सिल्व्हरफचा भाव प्रति औंस ६२.४५ डॉलर्स इतका आहे.