गुडन्यूज! बंगाल उपसागरातील चक्रीवादळामुळे कोसळधार, विदर्भासह मराठवाड्याला पाऊस झोडपणार

Foto
 मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि लवकरच चक्रीवादळ हे पुढे सरकणार आहे. यामुळे दुष्काळाशी सामना करणार्‍या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार आहे. विदर्भ, मराठवाड्यासह खानदेश, पश्चिम महाराष्ट्र चिंब चिंब होणार आहे. चक्रीवादळ लवकरच तीव्र होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे सरकल्यावर देशातील १३ राज्यांमधील हवामान बदलेल. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑक्टोबरच्या या तारखेला विदर्भासह मराठवाड्याला पाऊस झोडपणार आहे.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे पश्चिम-वायव्य दिशेने सरकरण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय होईल. लवकरच चक्रीवादळ पुढे सरकेल. या चक्रीवादळाचे नाव अर्णव असे आहे. या संभाव्य हवामान बदलाने राज्यात कोसळधार पडेल. २७ आणि २९ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह इतर भागात पावसाच्या सरी कोसळतील.

शेतकर्‍यांना मोठा दिलासा
या हवामान बदलाचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल. २७ आणि २९ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील काही भागात पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण असेल. पाऊस चांगला झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना वरदान ठरेल. आता येत्या तीन ते चार दिवसात हवामान अनुकूल राहिल्यास या भागातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळेल. तर रब्बी पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरेल.

खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय हवामान विभागानं मच्छिमारांना शुक्रवारी संध्याकाळपासून ते येत्या बुधवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मच्छिमारांनी २५ ऑक्टोबरपर्यंत बंगाल उपसागराच्या पूर्व-मध्य आणि जवळपासच्या आग्नेय भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पश्चिम-मध्य आणि जवळच्या नैऋत्य भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी १८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले होते. चक्राकार वार्‍यांपासून कर्नाटकपर्यत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील कोकण किनारपट्टीसह अमरावती आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला होता. आता पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे.