पाल फाटा परिसरात जुगार अड्ड्यावरुन ३८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी): फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाल फाटा येथील बनसोड गिरणीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. 

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

१३ जून रोजी दुपारी सुमारे ३.५० वाजता आरोपी किशोर दिलीप प्रधान (रा. फुलंब्री), दीपक पांडुरंग गोरे (रा. पाथरी, ता. फुलंब्री) आणि आकाश देविदास ढोकळे (रा. पाल, ता. फुलंब्री) हे पाल फाटा येथील बनसोड गिरणीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पत्त्यावर पैसे लावून ङ्गङ्घझन्नामन्नाङ्गङ्घ नावाचा जुगार खेळताना आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल व इतर जुगाराचे साहित्य असा एकूण ३८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८४ / २०२६ दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार वक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नवघरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.