सिनेस्टाईल पाठलाग करीत गुंड जेरबंद

Foto
गावठी पिस्तूल, गांजा जप्त; आरोपीवर ११ गंभीर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) खुनाचा प्रयत्नासह ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराला जिन्सी पोलिसांनी सोमवारी (दि. २६) सिनेस्टाइल पाठलाग करून अटक केली. शेख अजीम शेख दाऊद ऊर्फ अजीम पुटक (४७, रा. संजयनगर) याला पकडण्यासाठी पोलिसांनी घरामागील बोळीतून पळ काढल्यानंतर पाठलाग केला. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, गांजा आणि चाकूसह ७६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
खुनाच्या
प्रयत्नाच्या
गुन्ह्यातील मोस्ट वाँटेड अजीम पुटक हा संजयनगरमध्ये पिस्तूल घेऊन लपून बसल्याची माहिती
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश ताठे यांना मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव
धारदार चाकूसह चिलीम जप्त
त्याच्या घराची झडती घेतली असता गावठी पिस्तूल व मॅगझिन, १२० ग्रॅम गांजा, पितळी चिलीम, धारदार चाकू आणि २० हजार रुपयांचे तीन मोबाईल असे साहित्य मिळून आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजहर कैसर शेख यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अमोल काकडे, विनोद खरात, किरण खिल्लारे, मिना काकडे, गदई यांच्या पथकासह आरसीपी जवानांनी संजयनगरमधील त्याच्या घरावर छापा टाकला. कुटुंबीयांनी तो घरी नसल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने
सानप, अंमलदार संदीप सानप, हरिकराम वाघ, मनोज उईके, सुरेश वाघचौरे, शेख अझहर, पकडले.
घरात घुसून झडती सुरु करताच अजीमने घराच्या पाठीमागील बोळीतून धूम ठोकली. तो शेजारीच बांधकाम सुरू असलेल्या एका घराच्या पहिल्या मजल्यावर लपण्यासाठी पळत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला
https:liepaper.sanjwarta.in/Powered By Vrudhee Solutions