पैठण, (प्रतिनिधी): गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत सन २०२४- २०२५ वर्षात १७ लाभार्थ्यांची निवड झाली असून सदरील लाभार्थ्यांना आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते एकूण ३४ लक्ष रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले होते.
२०२५- २०२६ या वर्षात एकूण १० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून या लाभार्थ्यांना एकूण १९ लक्ष रुपये अनुदान आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभागृहात वितरित करण्यात आले आहे. याप्रसंगी तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोड, राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र तांबे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, नंदकुमार पठाडे, विनोद बोंबले, रवींद्र तात्या शिसोदे, दादा बारे, विजय गोरे, अक्षय डुकरे, सोमनाथ परदेशी, भूषण कावसनकर, स्वीय सचिव सतीश आंधळे, नामदेव खरात, रावसाहेब अडसूळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विलास भुमरे म्हणाले की घरातील कुटुंबकरता गेल्यावर या कुटुंबावर किती दुःखाचे डोंगर कोसळते याची आम्हाला जाणीव आहे या दुःखातून सावरण्यासाठी शासनातर्फे फुल ना फूळाची पाकळी म्हणून सहानुग्रह अनुदान दिले जाते. सदरील योजनेचे अनुदान तातडीने वितरित करावे कोणतेही शेतकरी लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यावी असे आदेश आमदार विलास बापू भुमरे यांनी दिले होते.
त्या नुसार ९ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या सभागृहात लाभार्थी मेघलता रामा मुळे, शिवाजी पंढरीनाथ रहाटवाडे, रमेश अंबादास गायके, पियुष राजू शिंदे, मनीषा मलाजी शेकडे, योगेश अंबादास गरजे, मंदाबाई दत्ता घायाळ, गंगुबाई लक्ष्मण भावले, रामभाऊ केशव गालफाडे, मोनिका प्रवीण वाकडे, या लाभाथ्यर्थ्यांना लाभ देण्यात आला.
यापुढे महाडीबीटीवर शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आव्हान तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी केले. उप कृषीअधिकारी अशोक वाकचौरे शाम कांबळे यांनी कार्यक्रम यशवितेसाठी परिश्रम घेतले.















