वाळूज महानगर, (प्रतिनिधी) बजाजनगर : तिसगाव येथे बुधवार गोवर्धन पूजेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान येथील सलामपूरे कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम आयोजित केला होता.
भगवान श्रीकृष्णाच्या गोवर्धन पर्वत उचलण्याच्या लीलेमध्ये इंद्रदेवाच्या क्रोधापासून गोकुळवासीयांचे संरक्षण केले. हा सण निसगार्ची पूजा व अहंकारावर विनम्रतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी गायीच्या शेणाने गोवर्धन पर्वत बनवून त्याचे पूजन करतात. यामुळे गोवर्धन परिक्रमेला विशेष महत्त्व आहे. दरम्यान हु आख्यायिका जोपासत तिसगाव येथील सलामपूरे कुटुंब दरवर्षी गोवर्धन पुजा साजरी करतात.
तसेच गाईच्या शेणापासून गोवर्धन पर्वताची प्रतीकुती साकारली जाते. तसेच सडा सारवण, स्नान व उपवास व्रत ठेवून ही पुजा मांडण्यात आली. यावेळी पर्वत व गाईच्या पदकाचे पुजन करत हा गोवर्धन पुजा कार्यक्रम रितीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात आला.
यावेळी प्रा. डॉ. भरतसिंग सलामपुरे, चंद्राबाई सलमापुरे, मोहनसिंह सलामपुरे, रामसिंग सलामपुरे, अमृतसिंग सलामपुरे, ग्रा पं सदस्या रेणुका सलामपुरे, नंदाबाई सलामपुरे, मोनिका सलामपुरे, रेणुका सलामपुरे, ओमकार्सिंग सलामपुरे, आर्यन सलामपुरे, स्नेहल सलामपुरे, सोनल सूर्यवंशी, अनुष्का सलामपुरे, रुद्र सलामपुरे, तोलू सलामपुरे आदींची उपस्थिती होती.