सरकार मराठा आरक्षणाबाबात सकारात्मक : मुख्यमंत्री

Foto
नागपूर : मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबात सकारात्मक आहे. सरकारची भूमीका पारदर्शक आहे. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहे. आम्ही समाजांना एकमेकांनासमोर आणून भांडत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच आम्ही समाजाच्या हिताचे निर्णय घेतो. परंतु त्याचवेळी संविधान आणि न्ययालयाच्या निर्णयाच्या आधिन राहून निर्णय घेतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही
एका समाजाचा काढून दुसर्‍या समाजाला द्यायचा असं कधीही केलं नाही, ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, मराठा समाजाचाही त्या ठिकाणी समाधान करून देण्याकरिता सगळे निर्णय घेऊ परंतु ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आता चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घेण्यास तयार आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. 

मनोज जरांगे उपोषणाला बसण्याआधी काय म्हणाले? 
मराठा समाज मोठा होऊ नये, असा विचार असणार्‍यांची संख्या जास्त आहे. कितीही चांगला जीआर काढला तरी त्याला आव्हान दिलं जातं. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणार्‍याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या नाही दिली तर अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला अधिकार आहे, ते कलम कमी करू शकतात, बलिदान देणार्‍या कुटुंबाचा निधी आणि नोकरीचा विषय आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याचा एक विषय आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत यावे 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत यावे. एकदा याच ठिकाणी आम्ही आमच्या आई-बहिणींना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आहे. पुन्हा असा विचार करु नका. पोलीस लाठीचार्जच्या भानगडीत पडू नका. राज्यात तुम्हाला जड जाईल, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि पुन्हा आंदोलन थांबणार नाही, असं इशारा मनोज जरांगेंनी दिला. संवाद करून गोडी बोलाविणे मार्ग काढा. हल्ला करायचा नाही, मराठा शांत आहे. देवेंद्र फडणवीस आता दुसर्‍या वेळी हल्ला करणार नाहीत. तरीही मी बोलून दाखवले, असं मनोज जरांगे म्हणाले.