शासकीय जागा पेट्रोल पंपाला भाडेतत्वावर !

Foto
एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): विभागीय आयुक्तालयालगतची कोट्यवधी रुपयांची जागा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जिल्हा परिषदेने अधिकार नसताना ही शासकीय जागा पेट्रोल पंपाला भाडेतत्वावर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (दि. २२) पाहणी करत, या जागेची कागदपत्रे तपासून ती शासनाच्या नावे करण्याचे आणि संशयित फेरफाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी नियुक्त करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी
यांनी शासकीय जागांचा शोध घेऊन त्याच्या सातबारावर सरकारचे नावे लावण्याची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत चिकलठाणा आणि दिल्लीगेट यासोबतच विविध ठिकाणी सरकारी जागांवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा प्रकार त्यांना आढळून आला आहे. या जागेच्या घोळाबाबत माहिती मिळाल्यानंतर विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत यांनी मंगळवारी आयुक्तालयासमोरील जागेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, तलाठी, मंडळाधिकारी यांच्यासह नगरभूमापन आणि तालुका भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्तालयालगत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असतानाही तिचा वर्षानुवर्षे वापर न करता अडगळ करून ठेवल्याचे पाहून विभागीय आयुक्त संतापले. शासकीय जागा उपलब्ध असताना तिचा आजवर उपयोग का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे शासकीय कार्यालयांना जागा उपलब्ध
एसआयटी चौकशीत येईल सत्य
शासकीय जमिनींच्या मालकीत झालेले फेरफार, पीआर कार्डमधील नोंदी तसेच शासकीय जागा खासगी व्यक्तींच्या नावावर झाल्याची प्रकरणे यांची एकत्रित माहिती घेतली जाणार आहे. या संशयित प्रकरणांची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, यात व्यवहार व नोंदींची सत्यता समोर येईलच, असेही आयुक्तांनी सांगितले.
नाही. विभागीय आयुक्तालयाची इमारत कामकाजासाठी अपूर्ण पडत आहे. त्यामुळे आता या जागेचा वापर करता येईल, असे संकेतही त्यांनी दिले.
शहरातील संशयित शासकीय जमिर्तीच्या मालकीतील फेरफारांची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्यात येणार
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या जागेच्या मालकीत फेरफार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या जागेचे संबंधिताने पीआर कार्डही तयार केले. २०१० मध्ये एका अर्जाच्या आधारे नगर भूमापन कार्यालयाने ही जागा खासगी व्यक्तीच्या नावावर नोंदविल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions