पैठण, (प्रतिनिधी) : धनगाव येथील महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तथा शेतकरी -शास्त्रज्ञ फेलो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी, प्रयोगशील शेतकरी यज्ञेश वसंतराव कातबने यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार –२०२४' हा सन्मान जाहीर झाला आहे.पैठण तालुक्याला प्रथमच हा सन्मान लाभला आहे.
राज्यस्तरावरील अत्यंत मानाचा हा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यामुळे सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेल्या समर्पित कार्याचा हा सन्मान असून,त्यांच्या या यशामुळे पर्यावरण क्षेत्राचा गौरव अधिक उंचावला आहे.वृक्ष लागवड,वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीसाठी केलेले सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे.पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी कार्य असेच वृद्धिंगत होत चालले आहे.
कृषि वसंत फॉर्मच्या माध्यमातून इकोझोन निर्मिती,पर्यावरणपूरक शेती,बांधावरील झाडांचे संगोपन,तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड,वृक्ष संगोपन या साठी योगदान दिले आहे,त्या मुळेच शासन पातळीवर या कार्याची दखल घेतली गेली व त्यांना मानाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर केला आहे.या बद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने दिला जाणारा "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" सन-२०२४ करिता योगेश कादंबने यांना जाहीर झाला.
माधववृंद दिनाच्या पूर्वसंध्येला हा सन्मान जाहीर होणे,हा माझ्यासाठी निश्चित प्रभूस्पर्श आहे.पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठा आणि भविष्यासाठी खूप महत्त्वाचा हा पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितले.कृषिरत्न वसंतराव कातबनेह्यांचं कृषिक्षेत्रातील प्रदीर्घ,अजोड,प्रचंड योगदान,आपल्या सर्वांचं प्रेम,परिवाराची भक्कम साथ आणि खूप मोठ्या मित्र परिवाराच्या सहकार्याने राज्यसरकारचा "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" मिळाला आहे. ह्यासाठी त्यांनी वन विभाग,महाराष्ट्र शासनाचे आभार मानले .













