गंगापूर शहरात बुधवारी भव्य दहीहंडी उत्सव

Foto
अमोल दादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजन; प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये

गंगापूर, (प्रतिनिधी) श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गंगापूर शहरात उपनगराध्यक्ष अमोल दादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने सलग पाचव्या वर्षी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद मैदानावर हा उत्सव रंगणार आहे. 

उत्सवादरम्यान विविध गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा थरार नागरिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून रिया पाटील, सानिका रत्नागिरीकर आणि ऐश्वर्य जोशी-पुणेकर यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच ज्युनियर दादा कांबळे व विनोद बागुल यांच्या विनोदी सादरीकरणामुळे कार्यक्रमात मनोरंजनाची रंगत वाढणार आहे.

-- आकर्षक पारितोषिकांची लयलूट -- 
दहीहंडी स्पर्धेसाठी यंदा भव्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. गटनेते तथा नगरसेवक संतोष अंबिलवाडे यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी १ लाख ११ हजार १११ रुपये, जुनेद शेख यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार ५५५ रुपये, महावीर कटारिया यांच्याकडून तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार १११ रुपये, तर संदीप साबणे यांच्याकडून चतुर्थ क्रमांकासाठी ३१ हजार १११ रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

 उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन समिती, पदाधिकारी, कार्यकर्ते व अमोल दादा जगताप मित्र परिवाराकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. परिसरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष अमोल दादा जगताप
व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. 

नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्साह, आनंद आणि मनोरंजनाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने सलग पाचव्या वर्षी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा. सर्व गोविंदा पथकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.

आयोजकांकडून आवाहन : 
दहीहंडी उत्सव हा केवळ स्पर्धा नसून एकता, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. नागरिकांनी शिस्त व सुरक्षिततेचे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.