श्री शनेश्वर जन्मोत्सवानिमित्त सिल्लोड येथे भव्य महाप्रसाद

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : श्री शनेश्वर जन्मोत्सवानिमित्त सिल्लोड येथील समता नगर भागांत श्री शनि प्रतिष्ठानच्या वतीने भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास श्री १००८ महामंडलेश्वर महंत सदाशिव महाराज शास्त्री, महंत दयानंद महाराज शेलगाव, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, ह. भ. प. अजबराव महाराज मिरगे तसेच शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक नंदकिशोर सहारे, शंकरराव खांडवे, सिद्धेश्वर आहेर नॅशनल सहकारी सूतगिरणी चे व्हाईस चेअरमन नरेंद्र पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री शनि प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रामेश्वर महाराज पवार, शेखर निरंजन भाकरे, डॉ. निलेश मीरकर, गणेश महाराज जोशी व कृष्णा लहाने यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत श्री शनेश्वर जन्मोत्सवाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व विषद केले. तसेच सत्कारमूर्तीना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यासोबतच उपस्थित भाविक भक्तांना श्री शनेश्वर जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले. प्रस्तावित महंत सदाशिव महाराज शास्त्री यांनी तर शेवटी श्याम शास्त्री यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.