सांजवार्ता
Date: 7/11/2026
रंगभूमी
शहरात रंगणार दर्जेदार नाटकांची मेजवानी; गाथा नाटकाने प्राथमिक फेरीला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील नाट्यरसिकांसाठी पुन्हा एकदा दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी घेऊन आलेल्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा सोमवारी (दि. १६) उत्साहात पडदा उघडला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला. या स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील रंगभूमीवर पुन्हा एकदा चैतन्य संचारले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आली. त्यानंतर
नाट्यचळवळीला मिळणार बळ
आज (दि.१७) रंग या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या नाट्यप्रयोगाकडेही नाट्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. ६५ व्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील नाट्यचळवळीला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने उपस्थित मान्यवर तसेच परीक्षकांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पूर्वा ठोसर, सुनील जगताप
आणि विवेक खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी, सिने व नाट्य अभिनेते डॉ. दिलीप घारे, ज्येष्ठ रंगकर्मी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. जयंत शेवतेकर, सरस्वती
भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर सिरसाठ तसेच रंगकर्मी, सिने व नाट्य अभिनेते पद्मनाभ पाठक उपस्थित होते.
यावेळी डॉ. दिलीप घारे यांनी सहभागी कलाकारांना मार्गदर्शन करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. हौशी नाट्य
स्पर्धा ही नवोदित कलाकारांना आपले अभिनयकौशल्य सादर करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ असून, अशा स्पर्धांमधूनच भविष्यातील उत्तम कलाकार आणि रंगकर्मी घडतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्घाटन सोहळ्यानंतर नाट्यप्रयोगांना सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गाथा या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या प्रयोगाला नाट्यरसिकांचा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेमुळे स्थानिक हौशी नाट्यसंस्थांमधील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, विविध विषयांवरील नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By Vrudhee Solutions













